---Advertisement---
बोदवड

मानव धर्म श्रेष्ठ धर्म : कुर्हे ग्रामस्थांनी दाखवली भूतदया, माकडावर केले अंत्यसंस्कार आणि दहाव्याचा कार्यक्रम

---Advertisement---

Bodwad News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । माणसाने प्राण्यांप्रती आपली माणुसकी दाखवणे या पेक्षा मोठा धर्म नाही. बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथे दहा दिवसांपूर्वी गावाजवळील नाल्यात एक माकड जखमी अवस्थेत गावकऱ्यांना दिसले. त्याच्यावर औषधोपचार केले पण ते वाचू शकले नाही. गावकऱ्यांनी आपल्या मानवतेच्या धर्माची जाणीव ठेवत त्या माकडावर अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी एखादा कुटुंबातील व्यक्ती वारल्या नंतर जसे दहावे करतात तसे विधिवत माकडाचे दहावे केले.

jalgaon 2022 10 10T134933.407

 बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथे दहा दिवसांपूर्वी गावाजवळील नाल्यात एक माकड जखमी अवस्थेत गावकऱ्यांना दिसले. त्याच्यावर औषधोपचार केले पण ते वाचू शकले नाही. गावकऱ्यांनी आपल्या मानवतेच्या धर्माची जाणीव ठेवत त्या माकडावर अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी एखादा कुटुंबातील व्यक्ती वारल्या नंतर जसे दहावे करतात तसे विधिवत माकडाचे दहावे केले. पुरुषांनी मुंडण करून माकडास श्रद्धांजली अर्पण केली. जीवन सोनवणे, सुरेश माळी, वामन ताठे, विश्वनाथ माळी,प्रमिला माळी, आंनदा कोळी, रेखा कोळी, वैशाली माळी, कृष्णा रोकडे,संजय माळी, अमोल माळी, सुलाबाई माळी, श्रीराम वानखेडे, रुपाली वानखेडे, निलेश माळी, कविता माळी, सुरेश माळी, गणेश माळी, सुरेश कोळी, बाबूराव कोळी, गजानन डोंगरे, दिपक रोकडे. या गावकऱ्यांनी या माकडाचे रामदूत म्हणून श्रद्धे पोटी हे केले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---