⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | तरुणांसाठी खुशखबर.. राज्यात तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरण्यात येणार

तरुणांसाठी खुशखबर.. राज्यात तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरण्यात येणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजेच राज्यात लवकरच पोलिसांच्या २० हजार पदांची मेगाभरती होणार आहे. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

 फडणवीस यांनी गृह आणि अर्थ विभागाच्या दोन स्वतंत्र आढावा बैठका घेतल्या. त्यात झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले, पोलीस दलासाठी दोन वर्षांत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार असून आठ हजार पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे. आणखी बारा हजार पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द होईल. पोलिसांच्या 20 हजार पदांसाठी ही भरती घेतली जाणार असल्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पोलीस भरती संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे काढण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्रात ७५ हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली आहे. भरती पोलीस भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या आधी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील वीस मैदाने सज्ज ठेवण्यात येणार आहेत ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.