जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२५ । महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होत असून या जागांवर महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.

या निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
भाजपकडून संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना संधी देण्यात आली आहे.
महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्याने या पाचही जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होण्याइतके संख्याबळ आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा अर्ज आहे. यामुळे आज राष्ट्रवादीचे संजय खोडके आज दुपारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चंद्रकांत रघुवंशी देखील आज दुपारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती अर्ज भरणार असल्याची माहिती पुढे आली आहे.