⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

पैशाची नितांत गरज आहे का? व्हाटसॲपवर ३० सेकंदात मिळेल कर्ज

Loan on WhatsApp । सध्याच्या काळात कोणाला केव्हा आणि कुठे तातडीच्या पैशांची गरज भासू शकते हे सांगता येत नाही. पण आता अशी अडचण आल्यास तुम्हाला कर्जासाठी बँकेच्या चकरा मारण्याची गरज नाही. आता तुम्ही घर बसल्या व्हॉट्सॲपवर चुटकीसरशी पैशांची व्यवस्था करू शकता. हो हे आम्ही अतिशय खरे सांगत आहोत. CASHe या इन्स्टंट लोन देणाऱ्या फ्लॅटफॉर्मने हि नवीन सुविधा सुरु केली आहे. यासाठी CASHe ने AI आधारित चॅट सेवा सुरु केली आहे. विशेष म्हणजे, कर्जाचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला कोणतीही कागदपत्रे देण्याची, तसेच कोणतेही इतर ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. या लेखात आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ

व्हॉट्सॲपवर कर्ज कसे मिळवायचे?
CASHe च्या मदतीने झटपट कर्जाच्या वैशिष्ट्यासाठी, वापरकर्त्यांना प्रथम +91 80975 53191 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सॲप चॅट बॉक्समध्ये जाऊन त्या नंबरवर Hi असा मेसेज पाठवा.  मेसेज पाठवल्यानंतर व्हॉट्सॲप बिझनेस वापरकर्त्यांना लागलीच कर्ज मिळेल. हे लोन प्री अप्रुव्हड असेल. 

संपूर्ण ऑटोमेटेड KYC
यात AI वर आधारित बॉट तयार करण्यात आला असून जे ग्राहकांच्या केवायसी पूर्णपणे ऑटोमॅटिक करण्यासाठी सक्षम आहे. KYC पूर्ण झाल्याबरोबर तुम्हाला ३० सेकंदात तुम्हाला किती लोन मिळू शकेल याची माहिती मिळते. विशेष म्हणजे या सेवेचा लाभ तुम्ही २४ तास केव्हाही घेऊ शकता. सध्या हि सेवा देखील पगारदार ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल.