---Advertisement---
गुन्हे रावेर

Raver : 4000 रुपयांची लाच स्वीकारताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । रावेरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शेतातील जमीन मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी ४००० रुपयांची लाच स्वीकारताना भूकरमापक राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली.

lach jpg webp webp

याप्रकरणी असे की, रावेर तालुक्यातील मस्कावद येथे तक्रारदार आणि त्यांच्या काकांची शेतजमीन असून, त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी मोजणीसाठी अर्ज केला होता. यासाठी आवश्यक शासकीय शुल्कही त्यांनी भरले. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2025 रोजी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी याने शेतात येऊन मोजणी केली.

---Advertisement---

मात्र, मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णीने ५,५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर, कुलकर्णी याने लाच हरभऱ्याच्या स्वरूपात देण्यासही सांगितले. यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीनंतर ACB ने 4 आणि 25 मार्च रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या वेळी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रथम ५५००, नंतर ५००० आणि अखेर ४००० रुपये लाचेची रक्कम निश्चित केली. २६ मार्च रोजी निंभोरा येथे एका शेताजवळ तक्रारदाराकडून ४,००० रुपये स्वीकारताना भूकरमापक राजेंद्र कुलकर्णीला ACB पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचखोर भूकरमापकाविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे.

यांनी केली कारवाई?
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार राकेश दुसाने, पोलीस हवालदार अमोल सूर्यवंशी यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment