⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार का? पारोळ्यातील सभेत मुख्यमंत्र्यांनी दिली खुशखबर..

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार का? पारोळ्यातील सभेत मुख्यमंत्र्यांनी दिली खुशखबर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२४ । राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचे आतापर्यत पाच महिन्याचे म्हणजेच नोव्हेंबरपर्यंतचे १५०० रुपयेप्रमाणे ७५०० रुपये पात्र महिलांच्या थेट खात्यात जमा करण्यात आले आहे. यांनतर मात्र निवडणूक आचारसंहिता असल्याने डिसेंबरचे पैसे मिळतील का नाही? असा प्रश्न महिलांना पडला आहे. अशातच पारोळा येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरचे पैसे कधी मिळणार हे सांगितले आहे.

२० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होताच लगेचच योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सभेत लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या आहे, सगळ्यात मोठी सभा आज इथं पारोळ्यात होत आहे. याचा मला आनंद आहे. महाविकास आघाडीच्या बकासुराविरोधात आपण आज सर्व एकत्र आलो आहोत. मला काय मिळालं याचा विचार न करता जनतेला काय मिळालं हे बघणारा नेता म्हणजे चिमणराव पाटील आहेत. ज्यावेळी उठाव झाला त्यावेळी पहिल्या पाच आमदारांमध्ये चिमण आबा हे होते, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, अन्यायाविरूद्ध पेटून उठणं हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेचं खच्चीकरण झालं. एकनाथ शिंदेंनी धाडस केलं नसतं तर आज शिवसेना आणि धनुष्यबाणही विकला असता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही होतो. ते विकासविरोधी आणि काम बंद पाडणारं सरकार होतं, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या सरकारनं घरातील वीजबिलावर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर व्हिजन महाराष्ट्र 29 हे स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं काम आहे. आपण असे अनेक शेतकरी फायद्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांनी फक्त फसव्या घोषणा दिल्या. गुलाबरावांच्या भाषेत सांगायचं झालं तर टांगा पलटी घोडे फरार, पण आम्ही जे केलं ते बरोबर केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.