⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | बातम्या | महिलांना स्वावलंबी बनवून आत्मसन्मान मिळवून देणारी ‘लाडकी’ योजना

महिलांना स्वावलंबी बनवून आत्मसन्मान मिळवून देणारी ‘लाडकी’ योजना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्रात रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचे भाऊबीजेपर्यंतचे ७,५०० महिलांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत या योजनेच्या माध्यमातून कित्येक गृहिणींना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आहे. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशातून छोटे छोटे स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. किरकोळ करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज आज महाराष्ट्रातील महिलाना उरलेली नाही. लाडकी बहीण योजनेतून युतीने महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे. यामुळे ही योजना खऱ्या अर्थाने महिलांची ‘लाडकी’ योजना झाली आहे.

महायुतीने सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून ही योजना चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, तब्बल अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कित्येक गृहिणींना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आहे. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशातून छोटे छोटे स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. आणि त्यातून चांगला नफा देखील मिळवला आहे. अनेक महिलांनी या पैशाच्या माध्यमातून आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिले आहेत.

काँग्रेस शासित राज्यांमध्ये बोजवारा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानली जात आहे. भाजप सरकारने देशात पहिल्यांदा गोव्यामध्ये बारा वर्षांपूर्वी या योजनेची सुरवात झाली. नंतर भाजपने मध्यप्रदेश, छत्तीसगढ ओडिशा सारख्या राज्यांत ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवली. या सर्व राज्यांमध्ये या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही सुरु झाली आहे. या योजनेमुळे देशातील महिलांना स्वावलंबी होण्यास मदत झाल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. भाजापप्रमाणे काँग्रेसने देखील महिलांसाठी योजना राबविण्याचा प्रयत्न काँग्रेस शासित राज्यांमध्ये करण्यात आला मात्र नियोजनाच्या अभावी अशा योजनांचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.

योजनेची बदनामी
या योजनेची वाढती लोकप्रियात पाहून या योजनेची बदनामी करण्याचा प्रयत्नही विरोधकांकडून झाला. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, पैसे कुठून देणार?” असा प्रश्न विरोधकांकडून सर्वात आधी विचारण्यात आला. पण सरकारने या योजनेसाठी 46000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून विरोधकांची बोलती बंद करून टाकली. त्यानंतर ” जमा झालेले पैसे ताबडतोब काढून घ्या, नाहीतर सरकारच ते काढून घेईल” अशी अफवाही पसरवण्यात आली. असे करुनही योजनेची लोकप्रियता महिला वर्गात कमी होत नाही, असे दिसताच विरोधक आणखीच आक्रमक झाले. “सत्तेत आल्यानंतर या योजना बंद करू” अशी धमकीच उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेत बोलताना दिली होती.

संभ्रम पसरवण्यासाठी विशेष मोहिम
महिला या योजनेवर प्रचंड खुश आहेत हे लक्षात आल्यानंतर सोशल मीडियावर या योजनेबद्दल संभ्रम पसरवण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. या योजनेचा काहीही उपयोग नाही, लोकांचेच पैसे लोकांना दिले यात नवल काय, महागाई वाढली अशी अनेक प्रश्नचिन्हे समाज माध्यमातून तसेच अन्य माध्यमातून उपस्थित केली जात आहेत. मात्र महिलांनी विरोधकांचा हा फेक अजेंडाही हाणून पाडला आहे. त्यामुळेच या योजनेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी राज्यातील भाजप महायुती सरकार आपल्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा स्पष्ट संदेश राज्यातील महायुती सरकारने दिला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.