डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद रुग्णालयात अत्याधुनिक ‘पंचकर्म उपचार सेवा’ सुरू

जून 12, 2026 4:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय तथा सशोंधन केंद्र येथे पंचकर्म उपचार विभागात अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पूनम सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे.

panchakram

महाविद्यालय व रुग्णालय हे जळगाव खुर्द येथे कार्यरत असून आयुर्वेद शिक्षण, संशोधन व रुग्णसेवेसाठी ओळखले जाते.आयुर्वेदातील पंचकर्म ही शरीरातील दोषांचे शुद्धीकरण करून आरोग्य संवर्धन करणारी महत्त्वपूर्ण चिकित्सा पद्धती मानली जाते.

या विभागात वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या प्रमुख पंचकर्म उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पंचकर्म उपचारांमुळे सांधेदुखी, मणक्यांचे विकार, त्वचारोग, स्थूलता, तणाव, निद्रानाश, पचनविकार तसेच विविध जुनाट आजारांमध्ये लाभ मिळू शकतो. महाविद्यालय प्रशासनाने नागरिकांना पंचकर्म उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी मोहीत येवले यांच्याशी ८८८८१३१६१९ या क्रमांकवर संपर्क साधावा. पंचकर्म ही केवळ उपचार पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणारी आयुर्वेदाची समग्र चिकित्सा आहे. रुग्णांच्या प्रकृती

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now