जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । भुसावळ तालुक्यातील खडका गावाजवळ खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात चाकू हल्ल्यामुळे एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीच्या पाठीमध्ये चाकूने हल्ला केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमीस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक व्यवहारांमध्ये वाद झाल्यामुळे हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. डिवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी सांगितले की, आठ दिवसांपूर्वी जखमी आणि आरोपी यांच्यात काही आर्थिक व्यवहाराच्या कारणांमुळे वाद झाला होता, ज्यामुळे हा हल्ला घडला आहे. पोलीस पुढील तपास करत असून हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी शोध सुरू आहे.