---Advertisement---
गुन्हे यावल

Yawal : एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात, एकाच मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । एसटी बस आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ घडली. अशोक यशवंत सपकाळे (रा. किनगाव खुर्द) असं या अपघातातील मयताचे नाव असून याप्रकरणी संध्याकाळी यावल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

kingaon accident

या घटनेबाबत असे की, यावल आगाराची एसटी बस (क्र. एमएच-१४ बीटी-२१४४) जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल (क्र. एमएच-१९ एटी-८५८८) सोबत दुपारी १ वाजता किनगाव गावाजवळ जोरदार धडक झाली. या अपघातात मोटरसायकल एसटीच्या पुढील चाकाखाली आल्याने सपकाळे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तातडीने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी एसटी बसचे चालक रघुनाथ वेळू भुते यांनी वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र अपघात टळू शकला नाही.

---Advertisement---

अपघाताची माहिती मिळताच सपकाळे यांच्या पत्नी यावलवरून किनगावकडे येत होत्या. मात्र, अवघ्या दहा मिनिटांपूर्वीच त्यांचे पती अपघातग्रस्त झाल्याची आणि त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळताच त्यांनी बसमध्येच हंबरडा फोडला. या वेळी बसमधील प्रवाशांनी त्यांना सांत्वन केले. मयत अशोक सपकाळे हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. संध्याकाळी यावल पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment