२० लाखात विकलेले काय सावंत साहेबांवर बोट ठेवणार : खुबचंद साहित्या

जून 27, 2022 9:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । शिवसेना बाळासाहेबांची आहे डुप्लिकेटांची नाही, अशा प्रकारची पोस्टरबाजी संपूर्ण जळगाव शहरात संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केली आहे. त्यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपातून शिवसेनेत आलेले बंडखोर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी संजय सावंत यांच्या संपर्कप्रमुख म्हणून असलेल्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हॉटेलात पार्ट्या झोडणारा म्हणत दारकुंडे यांनी मेसेज व्हायरल केले आहे. दरम्यान, शिवसैनिक खुबचंद साहित्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून २० लाखात विकलेले काय सावंत साहेबांवर बोट ठेवणार असे म्हणत त्यांनी नाव न घेता बंडखोरांवर निशाणा साधला आज.

khubchand sahitya 2 jpg webp

नगरसेवक नवनाथ दारकुंडे मेसेजद्वारे म्हणाले की, मी नवनाथ विश्वनाथ दारकुंडे नगरसेवक जळगाव महानगरपालिका आजच्या राजकीय घडामोडीवर एक प्रश्न विचारू ईच्छितो, संजय सावंत हे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख आहे त्यांच्या जिल्ह्यातील पाचही आमदार मंत्री शिंदे गटात सामील झाले मग पक्षनेते त्यांचा राजीनामा घेणार आहे का? नैतिक जबाबदारी स्वीकारून संजय सावंत राजीनामा देणार का? जळगावमध्ये ते बॅनरबाजी करताय मग ते आजपर्यंत कुठे गेले होते? एका खाजगी हॉटेल मध्ये बसुन ते पार्ट्या झोडतात तेव्हा त्यांना पक्ष दिसला नाही का? तरी माझी मागणी आहे की संजय सावंत यांनी आपल्या संपर्कप्रमुख पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी दारकुंडे यांनी केली आहे. दारकुंडे यांचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, मेसेजबाजीला उत्तर देताना शिवसैनिक खुबचंद साहित्या यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वीस लाख घेऊन विकले गेलेल्यांनी संजय सावंत यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असे थेट आव्हानच साहित्या यांनी दिले आहे. राज्यातील घडामोडींच्या निमित्ताने बंडखोर नगरसेवक विरुद्ध खरे शिवसैनिक असा वाद आपल्याला पाहायला मिळणार असून जळगाव मनपात कोण खुलेपणाने कुणाची बाजू घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल हे मात्र निश्चित आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now