Saturday, May 28, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

भुसावळच्या नजीम बानो यांचा केरळच्या स्नेहालयने केला सांभाळ, ६ वर्षांनी परतल्या घरी

good work 1 1
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
February 26, 2022 | 3:19 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ शहरातील शिवाजी नगरातून नजीम बानो या मानसिक रुग्ण महिला सन २०१६ मध्ये हरवलेल्या असून केरळातील कासरगोड भागात आढळल्या होत्या. स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर, पोलिस व शहरातील सुभाष पाटील यांच्या मदतीने तब्बल पाच वर्षांनंतर पुनर्वसन केंद्राच्या पॉली दास यांनी शुक्रवारी नजीम बानो यांना नातेवाइकांच्या स्वाधीन केले. तर शहादा येथील बेपत्ता मानसिक रुग्ण महिला रंजना पवार यांनाही नातेवाइकांकडे सोपवले.

केरळातील रेल्वे पोलिसांनी काही दयनीय अवस्थेतील आजारी महिलांना पुनर्वसन केंद्रात भरती केले होते. तेथे मेडिटेशन व औषधोपचार झाल्यानंतर महिलांची प्रकृती घराचा पत्ता सांगण्यापर्यंत सुधारली. यातील एक महिला राईबाई हिने परभणी जिल्ह्यातील बोरीचा उल्लेख केल्याने स्नेहालयाच्या पॉली दास या स्वयं-सेविकेने शोध सुरु केला. यात भुसावळातील व सध्या तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष पाटील यांनी मदत केली. परभणी तील महिलेला नातेवाइकांकडे सोपवल्यानंतर शुक्रवारी भुसावळातील शिवाजी नगरातील नजीम बानो व शहादा येथील रंजना पवार यांना सोबत घेत पॉली दास यांनी सचखंड एक्स्प्रेसने भुसावळ गाठले.

भुसावळ शहरामध्ये नजीम बानो यांना भाऊ रईस खान व वहिनी रुकैय्याबानो खान यांच्या हवाली केले. तर रंजना पवार यांना नातेवाइकांकडे सोपवले. नजीम बानो या गतीमंद, मानसिक रुग्ण असल्याने सन २०१६ मध्ये घरुन निघून गेल्या होत्या, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. अनेकवेळा शोध घेवूनही त्या सापडल्या नव्हत्या. शहादा येथील रंजना पवार या सन २०१४ पासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

आता ‘त्या’ बहुतांश बऱ्या

विविध आघातांमुळे मानसिक रुग्ण बनलेल्या या दोन्ही महिलांची प्रकृती मेडिटेशन व औषधोउपचारानंतर बऱ्यापैकी सुधारली. वसमत तालुक्यातील बेडगाव येथील राईबाईंचा शोध घेतल्यानंतर, भुसावळ व शहादा येथील या दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांना शोधता आले. मेडिटेशनमुळे त्या आनंदी जिवन जगतील, अशी आशा पॉली दास, समुपदेशक, स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर केरळ यांनी व्यक्त केली.

  • विद्यार्थ्यांची यंदा होणार सेतू अभ्यासक्रमातून उजळणी
  • चुकीच्या हाती आंदोलन गेल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसानच झाले : संदीप शिंदे यांचा आरोप
  • जळगावात ढगाळ वातावरणामुळे उकाडा पुन्हा वाढला, आज जिल्ह्यात पूर्वमाेसमी पावसाची शक्यता
  • राज्यमंत्री बच्चु कडु उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, असे आहे दौऱ्याचे नियोजन
  • जुन्या वादातून ७७वर्षीय वयोवृद्धाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा, भुसावळ
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
upshan

उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती ढासळली, कर्तव्यदक्ष अधिकारी, पुढारी गायब

milk

दूध उत्पादकांसाठी खुशखबर.. दुधाच्या खरेदीदरात इतक्या रुपयाची वाढ

nmu jalgaon

बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी तीन कोटी रुपयांचा निधी देणार ; मंत्री उदय सामंत

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist