Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

केसीई. चे आयएमआर “उद्योग प्रारंभ” हा उद्योजकता दिवस साजरा

udhyojak divas
चेतन पाटीलbyचेतन पाटील
April 19, 2022 | 1:59 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । केसीई. चे आयएमआर मध्ये उद्योजकता विकास सेल तर्फे उद्योजकता दिवस मनवण्यात आला. कोणतीही बिझीनेस फॅमीलीची पार्श्वभूमी नसतांना, शुन्यातुन उद्योग विश्व निर्माण करणार्‍या दोन महत्त्वपूर्ण उद्योजकांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडलेत.

यावेळी ते उद्योजक म्हणजे किरण कासार आणि उद्योजक प्रमोद संचेती. प्रमोद संचेती म्हणालेत, उद्योग करतांना पिक पाॅईंट लक्षात घ्या.. व्हीजन ठेऊन व्यापार करायचा असतो.. काॅस्टिंग काढता यायला पाहिजे, वेस्टेज टाळता आले पाहिजे. लेबर लाॅ देखील माहित हवा. वुई अ‍ॅडमिट मिस्टेक. एक धकवुन घेऊ पण नंतर सुधारणा वर भर द्यावाच लागेल. क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे असलीच पाहिजे. उन्हाळ्यात आम्ही घरी कुलर करायचो जुगाड करुन.. ही जुगाड करायची सवयच मला उद्योजक बनवून गेली. सुरवातीला पिंच सोडा सुरु केला.. उन्हाळ्यात हा बिझनेस जोरात असायचा.. पण पावसाळा सुरु झाला की साॅस बनवायला सुरवात करायचो. आहार नावाचे राष्ट्रीय प्रदर्शन बघितले. त्यातुन फार मोठे इनपुट मिळाले.असे नवीन शिकण्यासाठी तुम्ही कायम फिरत राहायला हवे.. बघत राहायला हवे. शिकत राहायला हवे. प्रॉडक्शन costing साठी स्वतःला आता पासून तयार करा. प्रॉफिटचा विचार करा. vender meeting attend केले पाहिजेत . काही काळ मी व्हीआयपी या कंपनी वर depend होतो.. company 100%buyer असल्याचा धोका लक्षात घेऊन वेगळा विचार करुन काम सुरु केले. Soft drink bottle मध्ये काम सुरू केले.


आज महिन्याला 1 कोटी बॉटल बनवतो. hair oil bottle पण आम्ही बनवतो… सगळ्याच बॉटल आता पेट मध्ये बनवतो. जेव्हा हे वेस्टेज बनते तेव्हा यातून पण अनेक प्रॉडक्ट बनतात. प्रदर्शनातूनही अनेक गोष्टी शिकता येतात. आज मी इथिओपियात कंपनी सुरु केली आहे. घाना मध्ये बिझनेस करतो.
नेहमीच लक्षात ठेवा आपण नोकरी धरतो आणि धंद्यांत पडतो. एकदा धंदयात पडले की परतायचा विचार करायचा नाही.. धडपडलात तरी पुढे जायचाच विचार करायचा..मार्केटिंग मध्ये काम करतांना टेक अवे.. चा अनुभव शैअर करतो हे सांगत, त्यांनी नव्याने बनवलेले काही प्राॅड्क्ट दाखवले. त्यानंतर बोलतांना किरण कासार यांनी सांगितले, 1987 साली स्वतःचा व्यवसाय सुरु केला.10 वर्षे स्वतःची गाडी स्वतः चालवली.. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय होता. काही पार्ट मिळत नव्हते.. म्हणुन स्पेअर पार्टचे दुकान सुरु केले. आयुष्यात गिव्ह अप कधीच नाही केले.. कायम चौके छक्कै नाही मारलेत.. पण पिच नाही सोडले.

आज 50 ते 60 कोटीचा व्यवसाय करतो.. 92 ते 97 या सालात डोअर टू डोअर मार्केटिंग केली. त्यावेळी तीन प्रकारच्या ट्रक विकण्यासाठी फीरलो.. पाच वर्षांनी 97 साली पहिली गाडी विकली गेली. नंतरच्या दोन वर्षात200,250 गाड्या विकल्यात. हे फळ मला पाच वर्षांनी मिळाले. 2017 नंतर प्रत्येक वर्षी मला बेस्ट डिलरशिप चे ऑवार्ड मिळाले.
तुमच्या कस्टमरला सेंटर पाॅईंट समजून चला.. एन्ड युजर तोच आहे.. त्याच्या मुळेच फायदा होतो त्याच्या मुळेच तोटाही होतो. माझ्याकडे जास्तीत जास्त कस्टमर रीपीट कस्टमर आहे. तुमचा ऑटीट्युड ठरवतो की तुम्ही कीती पुढे जाणार.
हा शब्द 100%आहे. या शब्दाला आज नाॅलेजपेक्षा जास्त महत्व आहे. तुमचा लगन.. तुमचा आभ्यास.. नेहमीच महत्त्वाचा आहे. सातत्य महत्वाचे आहे.

सर्विस डिलरशिप आणि सेल्स डिलरशिप मधला फरक त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय व्यवस्थित समजवून सांगितला. सेल्स डिलरशिप म्हणजे गाडी विकणे, हे लग्न करण्यासारखे आहे पण सर्विस डिलरशिप हे संसार करण्यासारखे आहे… यानंतर सुनील तरोडकर यांनी त्यांचे अनुभव सांगितले. प्रस्थावना संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी केली. गेल्या अनेक वर्षांपासून आय एम आर मध्ये उद्योजक दिवस मनवला जातो. आमच्या संस्थेतुन आजवर मॅनेजर आणि उद्योजकांचा विचार केला तर उद्योजक मोठ्या प्रमाणात घडले आहेत असे त्या म्हणाल्यात. कार्यक्रमाचे नियोजन एम बी ए कोआॅरडिनेटर डॉ पराग नारखेडे आणि एन्ट्राप्रिनर सेल प्रमुख डॉ शमा सराफ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रा जयश्री महाजन यांनी केले.या कार्यक्रमाला डॉ अपर्णा भट कासार, सुनिल ओवळे, डॉ ममता दहाड उपस्थित होते.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
raste

पाचोरा व भडगाव तालुक्यातील मातोश्री शेत पाणंद रस्ते कामे त्वरित सुरू करा : आ.किशोर पाटील

Rbi guidelines for taking torn notes

तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत? मग् टेंशन सोडा, असे मिळतील पूर्ण पैसे परत

Symphony cooler

गर्मी सहन होत नसेल तर 945 रुपये भरा आणि घरी घेऊन या Symphony चा कुलर, खोली लगेच होईल थंड

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.