⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जळगावच्या कांचनने सुवर्ण व रजत पदक पटकाविले

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । प्यारा ओलंपिक राष्ट्रीय स्पर्धा ११ ते१३ नोव्हेंबर दरम्यान गुहाटी येथे संपन्न झाली. यात जैन स्पोर्ट्स अकॅडमीची एकलव्य पुरस्कार प्राप्त खेळाडू तथा प्यारा ओलंपिक असोसिएशन जळगावची सदस्य कांचन प्रभाकर चौधरी हिने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक तर १०० मीटर फ्री स्टाईल मध्ये सिल्वर पदक पटकावून महाराष्ट्राचे व जळगावचे नाव उज्वल केले.

जळगावात आज तिचे आगमन होताच एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांना प्यारा ओलंपिक असोसिएशनचे सचिव फारूक शेख यांनी ही आनंदाची बातमी दिली असता स्वाफुर्तीने सर्व पदाधिकारी व आयोजकांनी त्वरित कांचनचे कार्यक्रम संपताच पुष्प गुच्छ देऊन गौरव करण्यात आले.

या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती
प्यारा ऑलिंपिक,जलतरण, हॉकी व फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख,सॉफ्ट बॉलचे डॉक्टर प्रदीप तळवलकर ,तलवारबाजीचे प्रशांत जगताप, अथलेटिक्स असोसिएशनचे राजेश जाधव, योगा संघटनेच्या सौ संगीता पाटील,क्रीडा महा संघ चे प्रशांत कोल्हे, एकलव्य चे जोशी, शूटिंग असोसिएशनचे दिलीप गवळी, दिव्य मराठीचे वृत्त संपादक विजय राजहंस व क्रीडा प्रतिनिधी चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.

जैन स्पोर्ट्स चे अशोक जैन व अतुल जैन,प्यारा ऑलिंपिक असो योगेश पवार,शकील शेख, प्रभावती चौधरी, प्रा डॉ अनिता कोल्हे, निवेदिता ताठे ,प्रवीण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी,अरविंद देशपांडे, विवेक आळवणी यांनी सुद्धा अभिनंदन केले.