सहकार पॅनलच्या दोन उमेदवारांची फेर मतमोजणीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शेतकरी पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले असून अमर जैन आणि रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. मतमोजणी शीट पुन्हा तपासण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांना दिली आहे.

जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण २० संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते.

या निवडणुकीसाठी एकूण ४४१ मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला.