लाडकूबाई’च्या जयेशने राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

डिसेंबर 30, 2021 3:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित लाडकूबाई विद्या मंदिर व दादासाहेब सु.मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणारा जयेश संदीप पाटील या विद्यार्थ्याने लातूर येथील राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदक व सन्मानचिन्ह पटकावले आहे.

jayesh jpg webp

संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, सचिव डॉ.पूनम पाटील, प्रशांत पाटील तसेच प्राचार्य वैशाली पाटील, उपप्राचार्य आर.डी. महाजन, पर्यवेक्षक बी.जे. पाटील यांच्यासह सर्वांनी जयेशचे काैतुक केले. त्यास क्रीडा शिक्षक डी.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now