जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठवले मोदींना ५०० अभिनंदनाचे पत्र

जून 22, 2021 2:34 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । गगनाला भिडलेली महागाई, वाढलेले पेट्रोलचे दर आणि ढासळत असलेली देशाची अर्थव्यवस्था यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेरी (ता. जामनेर) येथील कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांना केंद्र सरकारचे उपसहात्मक पर अभिनंदन करणारे 500 पत्र पाठवून केंद्र सरकारचा निषेध केला.

jamner ncp

यावेळी सरकार विरोधात निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते अशोक कोळी, राजू दादा पाटील, सरपंच दिनू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष किशोर आप्पा खोडपे, सोशल मीडिया प्रमुख निलेश बोदडे, उपाध्यक्ष आशिष दामोदर, नेरी युवा गट प्रमुख रुपेश पाटील, नेरी गण प्रमुख शुभम मोगरे, नेरी शहराध्यक्ष पवन वाघ, विद्यार्थी प्रमुख विवेक कुमावत, जळगांव शहर सरचिटणीस गणेश पाटील, स्वप्नील पाटील, हृषीकेश पाटील, शुभम खोडपे, यश सोनार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now