जलजीवन मिशन मधून नळजोडणी लवकर करा

ऑगस्ट 20, 2021 6:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ ।  बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडीतील निर्जळी दूर व्हावी जलजीवन मिशन च्या माध्यमातून या अंगणवाड्याना नळजोडणी लवकर करण्यात यावी जिल्हात 1 हजार कुपोषित बालकांची आकडेवारी समोर आल्याने पालक वर्गात भितीचे वातावरण झाले आहे.

jaljeevan mision

३४६० अंगणवाड्यापैकी अद्याप १६३२अंगणवाड्या मध्ये जोडणी झाले नाही त्याच बरोबर स्वच्छता गृहाचा अभाव असल्याचे समोर आल्याने अंगणवाडीच्या बाबतीत अनेक समस्या भेडसावत असल्याचे चिञण दिसत आहे शुन्य ते सहा वयोगटातील बालकं स्तनदा माता गरोदर,माता किशोरवयीन मुली,यांच्यासाठी या विविध उपक्रम राबविले जातात.

यात शिक्षण ते आरोग्यवर्धन,मार्गदर्शन ते सुपोषण यावर भर दिला जातो यासाठी अंगणवाडी मिनी अंगणवाडी कार्यान्वित असून त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. बालक माता मुली यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या अंगणवाड्या गावातील मोकळया जागेत विरळ वस्ती भागासह वाडी, अन,वस्तीवर पाड्यावर दुर्गम भागातील अंगवाडीत बहूधा पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा सांडपाण्याची सोय उपल्बध नसते. यामुळे या ठिकाणी पोषण आहार घेतला.

तर पाणी प्यायचे कुठले असा प्रश्न भेडसावत आहे या स्थितीचा केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणावाडीत पाण्याची सोय महत्वाची मोहीम शासनाने हाती घेतली जिल्हातील सर्व अंगणवाडीना जलजीवन मिशन अंतर्गत शाश्वत पाणी पुरवठा, उपल्बध करून देऊन लवकर नळजोडणी करण्यात यावी याबाबत जळगाव जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी यांना निवेदन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. आदरणीय सीईओ डॉ. पंकज आशिया साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now