⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | यंदाच्या सुरुवातीला सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव ; महिन्याभरात दरवाढीची शक्यता

यंदाच्या सुरुवातीला सोयाबीनला मिळाला ‘हा’ भाव ; महिन्याभरात दरवाढीची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२३ । २०२१ मध्ये सोयाबीनला विक्रमी ९ ते ११ हजार रुपयाचा दर मिळाला होता. मात्र गेल्या वर्षी सोयाबीनचे दर ५ हजार रुपयापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे यंदा सोयाबीनचा दर वाढणार कि कमी राहणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, यंदा आता सोयाबीनला ४१०० ते ४३०० पर्यंतचा भाव मिळत असून, आगामी महिनाभरात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे.

गेल्या चार वर्षांपासून ऐन काढणीच्या वेळेसच अतिवृष्टी होत असल्यामुळे २०१९ ते २०२२ या चार वर्षात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र यंदा सोयाबीन काढण्याच्या वेळेस पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी सोयाबीनचे उत्पन्न झाले आहे. या उत्पादनात घटीची शक्यता नाही. उत्पादनासोबतच सोयाबीनची गुणवत्ता देखील चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सोयाबीनला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाकडून सोयाबीनला ४६०० रुपयांपर्यंतचा भाव निश्चित केला आहे. तेवढा भाव शेतकऱ्यांना मिळण्याची मागणी केली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत बाजारात हमीभाव एवढा भाव देखील मिळत नाहीय.

भाव आणखी वाढणार
जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीन चांगल्या स्थितीत आहे. मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला पावसाअभावी तर काही ठिकाणी अतिपावसामुळे फटका बसला आहे. सध्या नवीन सोयाबीन बाजारात येत आहे. आगामी महिनाभरात सोयाबीनच्या मागणीत काही प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे ४५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत सोयाबीनचे भाव जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या वर्षी २५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. मात्र यंदाच्या खरीप हंगामात घट दिसून आली. यावर्षी १८ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे.

गेल्या वर्षी मिळाला होता ५ हजारांचा भाव
गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. २०२१ मध्ये सोयाबीनला विक्रमी ९ ते ११ हजारांचे दर मिळाले होते. मात्र, गेल्या वर्षापासून सोयाबीनचे दर वाढताना दिसून येत नाही. जळगाव बाजार समितीप्रमाणे जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनला चांगला भाव मिळताना दिसून येत नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.