⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

रेमेडीसीवरचा काळाबाजार : डॉक्टरसह १४ जणांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । सध्या महाराष्ट्र राज्यामधे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनवर उपचार करण्यासाठी असलेले रेमेडीसीवर इंजेक्शन साथरोग अधिनियम अन्वये अत्यावश्यक वस्तुमधे समाविष्ट करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाने सदर इंजेक्शनचे विक्रीवर नियंत्रण आणलेले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची गरज लक्षात न घेता इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका डॉक्टरासह वैद्यकीय प्रतिनिधी, मेडिकल चालक अशा १४ जणांच्या मुसक्या जळगाव जिल्हा पोलिसांनी आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. तरुणांकडून १२ इंजेक्शन हस्तगत करण्यात आले असून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्यात संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

रेमेडीसीवर इंजेक्शनची चोरटी विक्री अवास्तव किमतीत होत असलेबाबत माहीती पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांचे अधिपत्याखाली जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांचे नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले होते. 

पथकात यांचा होता समावेश

पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे त्यांचे सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील हवालदार विजय कोळी, कैलास सोनवणे, महेश महाले, रविंद्र मोतीराया, जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे, महेंद्र बागुल, प्रविण भोसले, रविंद्र तायडे, मनोज पवार, योगेश ठाकुर, फिरोज तडवी, हवालदार रविंद्र तायडे, मनोज पवार, प्रशांत पाठक, रविंद्र साबळे यांच्या पथकाने कारवाई केली.

१२ इंजेक्शनसह चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पथकाने स्वातंत्र्य चौक येथे छापा टाकला असता १२ रेमेडीसीवर इंजेक्शन, मोटार सायकली व मोबाईल असा एकूण २ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल व शेख समीर सगीर वय २३ रा.शिवाजी नगर, जळगांव, नवल लालचंद कुंभार वय २५ रा.खंडेराव नगर जळगाव, सुनिल मधुकर अहिरे वय ३२ रा हरीविठ्ठल नगर जळगाव, झुल्फीकार अली निसार अली सैय्यद वय २१ रा इस्लामपुरा धानोरा ता चोपडा, मुसेफ शेख कय्युम वय २८ रा मास्टर कॉलनी जळगाव, डॉ.आले मोहम्मदरवान, सैय्यद आसीफ सैय्यद इसा वय २२ रा खुबा मशीद जवळ सुप्रीम कॉलनी जळगाव, अझीम शहा दिलावर शहा वय २० रा सालार नगर जळगाव, जुनेद शहा जाकीर शहा वय २३ रा ओबस पार्क सालार नगर जळगाव असे मिळुन आले आहे. सर्वांवर भाग ५ गुरन १३६/२०२१ भादवि कलम ४२०, १८८, ३४ भादवि सह औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३ चे परीशीष्ट २६ सह अत्यावश्यक वस्तु कायदा कलम ३(७)(C),७(१)(a)(i),सह औषधे व सौदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९४५ चै कलम १८(८)चे उल्लंघन दंडनिय २७ (b) (ii) व कलम १८(२) चे उल्लंघन कलम दंडनीय २८ कलम २२ (१) (cca) चे उल्लंघन दंडनिय कलम २२ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या पथकाला कारवाईत दोन इंजेक्शन मोटार सायकल, मोबाईल असा एकूण १ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल मिळाल्याने शुभम राजेंद्र चव्हाण वय २२ रा झुरखेडा ता धरणगाव, मयुर उमेश विसावे वय २७ रा श्रध्दा कॉलनी नंदनवण नगर जळगाव, आकाश अनिल जैन वय २६ धंदा मैडीकल (नवकार फार्मा) रा मानस बिल्डींग आंबेडकर मार्केट जवळ जळगाव यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर भाग ५ गुरन १३६/२०२१ भादवि कलम ४२०, १८८,३४ भादवि सह औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३ चे परीशीष्ट २६ सह अत्यावश्यक वस्तु कायदा कलम ३(७)(C),७(१)(३)(i), सह औषधे व सौदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९४५. चै कलम १८(८) चे उल्लंघन दंडनिय २७ (b ) (ii) व कलम १८ (२) चे उल्लंघन कलम गडनीय २८ कलम २२(१) (cca) चे उल्लंघन दंडनिय कलम २२ (३ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.