गॅस सिलेंडर दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

मे 13, 2021 2:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत असल्यामुळे जनता त्रस्त आहे. काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केल्यामुळे सामान्य वर्गातील अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जळगावातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात  घोषणाबाजी देत आंदोलन केले.

new (3)

केंद्राच्या दरवाढीचा विरोध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोखा आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयातून ते आकाशवाणी चौकापर्यत हा मोर्चा काढून केंद्र सरकारच्या निषेध नोंदवण्यात आला. यावेळी गॅस सिलेंडरला हार घालून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी चव्हाण, डॉ. सुषमा चौधरी, मंगला पाटील, शकीला तडवी उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना सारख्या महामारीत सर्वसामान्य हाताला काम नसल्याने बेहाल झाली असून त्यात केंद्र सरकारतर्फे पेट्रोल, डीझेल व गॅसची  दरवाढ केली जात असल्याने सर्वसामान्यांनी जगावे कसे असा प्रश्न पडला आहे.  यातच आत्ता प्रत्येक दिवशी पेट्रोल व डीझेलची दरवाढ केली जात आहे. भाजप सरकारला सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यात सुख वाटत आहे. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात आहे. मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असं वंदना पाटील म्हणाल्या.

कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले असून इंधन दरवाढीने दुहेरी संकटाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. मोदी सरकारने दाखविलेल्या अच्छे दिन चे स्वप्न भंग पावले आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सर्वच क्षेत्रात महागाई वाढल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.  कोरोना काळात जनतेला दिलासा  देण्याएवजी दरवाढ केली जात असल्याने सर्वसामन्यांनी जगावे कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.त

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now