आता रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट ‘इतक्या’ हजारांचा दंड; जळगाव महापालिकेचा कडक इशारा

मार्च 31, 2026 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी महापालिकेने नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून रस्त्यावर अनधिकृत कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी किमान २ हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच शहरातील पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीसाठी परवाना घेणे बंधनकारक करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

kachara jl mahapalika

सोमवारी जळगाव महापालिकेची पहिली सभा पार पडली. यादरम्यान, महापौर दीपमाला काळे यांनी १० महत्त्वाच्या सुधारणांचा प्रस्ताव सादर केला असून, यात अनधिकृत कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईपासून ते पाळीव प्राण्यांच्या परवान्यापर्यंतच्या धोरणात्मक निर्णयांचा समावेश आहे.

शहरातील रस्ते आणि महामार्गाच्या कडेला ‘वेस्ट मटेरिअल’ किंवा कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्यांवर प्रतिब्रास २ हजार रुपये दंड वसूल करण्याची शिफारस केली आहे. या कारवाईतून मनपास १५ लाखांचे उत्पन्न मिळेल. विशेष म्हणजे, झाडांच्या फांद्या तोडल्यानंतरचा कचरा उचलण्याची जबाबदारी ‘बीव्हीजी’ कंपनीवर निश्चित करण्याचे आदेश महापौरांनी दिलेत.

दरम्यान, शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या नोंदणीची व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी परवाना सक्तीचा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परवाना घेतल्यास कुत्र्यांचे लसीकरण, आरोग्य तपासणी आणि सुरक्षिततेची नोंद ठेवणे सोपे होणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now