जळगावात दुचाकी चोरणाऱ्या दोन सराइतांच्या टोळीचा पर्दाफाश

एप्रिल 1, 2026 5:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच जिल्हापेठ पोलिसांनी भजे गल्लीतून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराइतांच्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली

crime 2 jpg webp

नवीन बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत दोन आरोपींना ताब्यात घेतले. अटकेत घेतलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान भजे गल्ली परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून होंडा कंपनीची ड्रीम दुचाकी जप्त केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने केली. या पथकात फौजदार शांताराम देशमुख, हेड कॉन्स्टेबल महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंखे, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now