आधुनिक तंत्रज्ञानासह ‘ऐनक प्लस’ जळगावकरांच्या सेवेत; उद्या ५ एप्रिलला नव्या दालनाचा शुभारंभ

एप्रिल 4, 2026 6:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील नामांकित गुरुनानक ऑप्टिकलचा अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता नव्या स्वरूपात नागरिकांसमोर येत आहे. अत्याधुनिक सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे ‘ऐनक प्लस’ हे नवीन दालन जळगावकरांच्या सेवेत दाखल होत असून त्याचा शुभारंभ उद्या, दि. ५ एप्रिल रोजी होणार आहे.

gurunanak

रिंग रोडवरील आरके टॉवर येथे हे अत्याधुनिक दालन सुरू होत असून, येथे ग्राहकांना डोळ्यांची तपासणी, विविध प्रकारच्या आधुनिक फ्रेम्स, लेन्सेस आणि दर्जेदार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. गुरुनानक ऑप्टिकलच्या विश्वासार्ह सेवेमुळे ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन झाला असून, त्याच विश्वासाच्या बळावर ‘ऐनक प्लस’च्या माध्यमातून आणखी दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या नव्या दालनामुळे जळगावकरांना अत्याधुनिक नेत्रसेवा आणि नवीनतम डिझाइनच्या ऐनकांचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या चेहऱ्याच्या आकारानुसार योग्य फ्रेमची निवड करण्यात करता येणार आहे. उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now