⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Jalgaon Politics : जळगाव मनपात बंडखोरांचा कॅरम परफेक्ट फुटलाय पण…

जळगाव लाईव्ह न्युज | जळगाव मनपा । चिन्मय जगताप । कोणालाही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये याचे पडसाद पडायला आता सुरुवात झाली आहे.

ज्याप्रकारे एखादा कॅरम परफेक्ट फुटतो आणि सोंगट्या चारही भोकात जातात. त्याचप्रकारे आता बंडखोर नगरसेवकांची अवस्था जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये झाले आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी अभूतपूर्व सत्ता परिवर्तन महानगरपालिकेमध्ये घडवून दाखवलं. शिंदे मुख्यमंत्री झाले यामुळे आता बंडखोर नगरसेवक ही त्यांच्या मागे मागे पडतील असा अंदाज राजकीय विश्लेषक लावत असतानाच मनपातील सहा बंडखोर नगरसेवकांनी फटाक्यांची माळ फोडत शिंदेंना आपला पाठिंबा दर्शवला. यामुळे आता एकूण २३ असलेल्या बंडखोरांपैकी ६ नगरसेवकांनी आपला पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांना दर्शवला आहे. यामुळे आता जळगाव शहर महानगरपालिकेतील शिवसेनेत एकूण ३२ नगरसेवक उरले आहेत. ज्याची वाटणी करायची झाली तर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले एकूण १५ नगरसेवक आणि भाजपातून शिवसेनेमध्ये बंडखोरी करून आलेले १७ नगरसेवक अशी करता येईल.

एकनाथ शिंदे यांनी कुलभूषण पाटील यांना हाती धरत भारतीय जनता पक्षातून तब्बल 27 नगरसेवक शिवसेनेत आणले आणि जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला. ज्यातून ५ नगरसेवक हे पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये गेले. आणि आता उरलेल्या 23 पैकी सहा नगरसेवक हे पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये न जाता त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे आता शिवसेनेच्या हक्काचे असलेले स्वतःचे ११ बंडखोर नगरसेवक हे शिवसेनेच्या हाताबाहेर गेले आहेत. याच बरोबर येत्या काळात अजून काही नगरसेवक शिंदे गटात किंवा भारतीय जनता पक्षात पुन्हा जाऊ शकतात असे म्हटले जात आहे.

जसा एखाद्या कॅरम पटू पहिलाच स्ट्राइक मध्ये आपल्या सगळ्या सोंगट्या फोडतो आणि कॅरम मध्ये सोंगट्यांची अस्थाव्यस्त परिस्थिती होते तीच परिस्थिती आता जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये बंडखोर नगरसेवकांची झाली आहे.

नगरसेवकांना बंड करताना असा काही प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडू शकतो असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्या पाठीमागे उभे असल्यामुळे आता आपल्याला पाच वर्ष कोणाचीही चिंता करायची गरज नाही असे त्या वेळेचा समज या नगरसेवकांचा होता. मात्र बंडखोर नगरसेवक फोडणारे एकनाथ शिंदे स्वतःच शिवसेनेतून बंड करून आता वेगळे झाल्याने स्वतःच नगरसेवक पद वाचवण्यासाठी नगरसेवक हव्या त्या मार्गाने स्वतःचा नगरसेवक पद वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बंडखोरांचे नेते म्हटले जाणारे कुलभूषण पाटील हे आता शिवसेनेत असून यापुढेही मी शिवसेनेतच असेल अस त्यांनी भर सभेत सांगितलं होतं. यामुळे बंडखोरांच्या कॅरम मधली बंडखोरांची राणी ही तरी सध्या शिवसेनेकडे आहे. मात्र इतर सोंगट्या नक्की कोणत्या भोकात जातात हे आता सांगणे कठीण आहे.

येत्या काळात एखाद वेळेस गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ शकतात असं म्हटलं जात असल्याने बंडखोरांमध्ये भीती च वातावरण आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त बंडखोर हे शिंदे गटाला जाऊन मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र येत्या काळात नक्की काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.