५३व्या IFFI आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जळगावचा सन्मान

नोव्हेंबर 21, 2022 6:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NFDC)माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने आयोजित भारत सरकारचा एकमेव अधिकृत चित्रपट महोत्सव दि.२० ते २८ नोव्हेंबर २०२२ रोजी गोव्यात संपन्न होत आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा प्रथमच खान्देशाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून विवेकानंद प्रतिष्ठानच्या संगीत विभागाचे प्रमुख किरण सोहळे यांची महोत्सवात विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे.

jalgaon 2022 11 21T182842.065 jpg webp

दि.२६ ते २९ नोव्हेंबर ह्या कालावधीत किरण सोहळे यांना महोत्सवात सहभागी होण्याचे भारत सरकारचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. संपूर्ण भारतातुन मोजक्या ३/४ व्यक्तींना हि संधी मिळत असते. हा बहुमान यंदा विवेकानंद प्रतिष्ठान ला मिळाला आहे. या निवडीबद्दल प्रतिष्ठान च्या अध्यक्ष शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे ,व्यवस्थापन मंडळ सदस्यहेमाताई अमळकर, विनोद पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now