
जळगाव लाईव्ह न्यूज । सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल २ हजार २०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ८ हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दरकपातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Jalgaon Gold Silver Price Today
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. त्यामुळे खरेदीसाठी योग्य संधीची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना आजच्या घसरणीमुळे दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांना या दरकपातीचा फायदा होऊ शकतो.
२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती?
जळगावच्या सराफ बाजारात रविवारी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार २१५ रुपये होता. सोमवारी त्यात २ हजार १५ रुपयांची घट होऊन हा दर १ लाख २३ हजार २०० रुपयांवर आला आहे.
त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा दर रविवारी १ लाख ३६ हजार ७०० रुपये होता. त्यात २ हजार २०० रुपयांची घसरण होऊन आजचा भाव १ लाख ३४ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
ळगाव सराफ बाजारात कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. रविवारी २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१,२५,२१५ रुपये इतका होता. आज त्यात २ हजार ०१५ रुपयाची घसरण होऊन ते ₹१,२३,२०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. तर रविवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,३६,७०० प्रति तोळा होता. त्यात २ हजार २०० रुपयांची घसरण होऊन ₹१,३४,५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला.
चांदीचा दर काय?
आज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण झालीय. रविवारी ₹१,८०,००० रुपये प्रति किलोवर असलेला चांदीचा दर आज ८ हजारांनी घसरून ₹१,७२,००० रुपयावर पोहोचला आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, आगामी काळात मौल्यवान धातूंच्या किमतीत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने सराफ बाजारातील पुढील दरबदलाकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.





