जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीत मोठी घसरण; आताचे दर तपासून घ्या..

जून 11, 2026 4:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२६ । सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्णबाजरात मागच्या काही दिवसापासून सोन्यासह चांदी दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी सकाळी सोनं आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदविण्यात आली. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात तब्बल १,५०० रुपयांची, तर एक किलो चांदीच्या दरात २,००० रुपयांची घट झाली. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

gold silver

काही आठवड्यांपूर्वी विक्रमी पातळी गाठणाऱ्या सोन्याने आता बऱ्यापैकी खाली आल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिक मास, सणासुदीची खरेदी आणि गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे आहेत.

काय आहे सोन्यासह चांदीचा दर

जळगाव सराफ बाजारात बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ३७०० रुपयांनी घसरला होता. यानंतर आज गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सोने पुन्हा १५०० रुपयांनी घसरले. यानंतर आता सोन्याचा दर १ लाख ४६ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे बुधवारी चांदी दरात १० हजाराची घसरण झाली होती यानंतर आज सकाळी पुन्हा २००० रुपयाची घसरण होऊन चांदीचे दर प्रति किलो अडीच लाखांच्या खाली आली आहे.

दरम्यान, सलग दोन दिवस झालेल्या घसरणीमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढली असून आगामी लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या दरकपातीचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी खरेदीला प्राधान्य दिले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now