⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | पितृपक्ष लागताच सोने-चांदीचा भाव धपकन पडले ; पहा आता काय आहेत भाव?

पितृपक्ष लागताच सोने-चांदीचा भाव धपकन पडले ; पहा आता काय आहेत भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात झालेल्या दरवाढीने सोन्याचा दर प्रति तोळा ७४ हजार (विना जीएसटी) रुपयावर गेला होता. सोबतच चांदीचा दर देखील मोठ्या किमतीने महागला. ऐन गणेत्सवात दोन्ही धातूंचे दर वाढल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. मात्र आता पितृपक्ष लागताच सोने-चांदीचा भाव धपकन पडले

या आठवड्यात सोमवार वगळता इतर दोन दिवस मौल्यवान धातूत घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा घसरणीचे संकेत मिळत आहेत. पितृपक्षात कुठलेही शुभकार्य करू नये, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये सोने-चांदी वा इतर वस्तूंची खरेदी करण्यात येत नाही. याचा परिणाम पितृपक्ष सुरू होत नाही तोच दिसून आला आहे.

जळगावच्या सुवर्णपेठेत गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरांमध्ये प्रति दहा ग्रॅम ६०० रुपयांची घट दिसून आली. यामुळे मंगळवारी ७४,४०० रुपये (विना जीएसटी) प्रति तोळ्यावर असलेला सोन्याचा भाव आज सकाळी ७३,८०० रुपयावर (विना जीएसटी) आला आहे. तर चांदी दरात १००० ते १२०० रुपयापर्यंतची घसरण दिसून आली. यामुळे सध्या चांदीचा एक किलोचा भाव ८९००० (विना जीएसटी) रुपयावर आला आहे.

दरम्यान, पितृपक्षानंतर सुरू होणारे नवरात्र आणि दिवाळीदरम्यान सोने खरेदी वाढेल. आपल्याकडे तुळशी विवाहानंतर लग्नकार्ये सुरू होतात. त्यासाठी नवरात्रीच्या काळात सोने खरेदी अधिक प्रमाणात होणार आहे. तसेच दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या दोन मुहूर्तांना हमखास उलाढाल होते. परिणामत: पितृपक्षाचे दिवस थंड असले तरी त्यानंतरचा काळ सराफा बाजारासाठी चांगला राहणार असल्याचं जाणकारांचे मत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.