जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२४ । एप्रिल महिन्यात तापमान वाढीसह सोने आणि चांदीच्या किमतीने ग्राहकांना चांगलाच घाम फोडला. किंमती सर्वकालीन उच्चांकावर पोहचल्या होत्या. मात्र एप्रिलच्या अखेरच्या सत्रात दोन्ही धातू नरमले. दोन्ही धातूंनी या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी पण मोठा दिलासा दिल्यामुळे आज सराफा बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना दरवाढीची झळ बसण्याची कमी शक्यता आहे. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती…Jalgaon Gold Silver Price 1 May 2024
एमसीएक्सवरील सोने चांदीचे दर
गेल्या काही दिवसांत आलेल्या तेजीनंतर आता सोन्याचा दर घसरताना दिसत आहे. सोमवारनंतर मंगळवारी देखील सोन्याच्या किमतीत घसरण नोंदविली गेली आहे. यामुळे आता एमसीएक्सवर सोन्याचा भाव ७०,४६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.१६ एप्रिलच्या तुलनेत सोन्याचा दर सुमारे 4 हजार रुपयांनी कमी झाला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात १२०० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीची किंमत ७९,४६० रुपये प्रति किलोवर आली आहे.
जळगावमधील दर
एप्रिल महिन्याच्या अखेरच्या सत्रात सोने आणि चांदीत घसरण दिसली. मागील दोन आठवड्यात सोने चांदीने माघार घेतली. गेल्या महिन्याच्या २१ एप्रिल रोजी जळगावात सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव सार्वकालीन ७४१०० रुपयावर (विनाजीएसटी) गेला होता. तर चांदीचा दर ८४००० रुपये (विनाजीएसटी) प्रति किलोवर गेले होता. मात्र आता दोन्ही धातू नरमले. जळगावात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ६६४१० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७२,५०० रुपयांवर आले आहे. दुसरीकडे चांदीचा दर ८१००० रुपयावर आला आहे. गेल्या दोन सत्रात सोने दरात ३५० ते ४०० रुपयांची घसरण दिसून आली तर चांदी दरात तब्बल १००० रुपयांची घसरण दिसून येत आहे.