जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । आगामी निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. यात जिल्हा उपाध्यक्ष २९, खजिनदार एक, सरचिटणीस ४२, चिटणीस ५१ विशेष निमंत्रित २१, कार्यकारिणी सदस्य २८, अशा एकूण १८० पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यांची नियुक्ती
नवीन जिल्हा कार्यकारिणीत जुने निष्ठावंत व तरुण, महिलांचा समावेश आहे. चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील डॉ. सुरेश श्यामराव पाटील यांची खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी फैजपूर कॉलेजचे माजी प्राचार्य व धरणगांव तालुक्यातील नांदेड येथील प्रा.शशिकांत सदाशिव पाटील (जी.पी.पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे, रावेर येथील दारा मोहम्मद, मुफ्ती हरून नदवी, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष के.डी.चौधरी , अनिल निकम, गोकुळ बोरसे, पिरन अनुष्ठान, रवींद्र निकम, रामराव पाटील, डॉ. स्मिता संदीप पाटील, विश्वासराव खुशाल पाटील, माजी आमदार नीलकंठ फालक, माजी सभापती इस्माईल फकीरा, एस.ए.भोई, यावलचे हाजी शब्बीर मोहम्मद खान, शरद तुकाराम महाजन.
सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, विजय पंढरीनाथ महाजन, सौ. अर्चना पोळ, बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, प्रदीप देवराम देशमुख, सम्राट परिहार, संदीप घोरपडे.राजेश मंडोरे, नदीम काझी, ज्ञानेश्वर महाजन, सम्राट परिहार, एक.टी.पाटील, रवींद्र कांडेलकर, राहुल मोरे आदी मान्यवरांचा समावेश करण्यात आलेला आहे.
चिटणीसपदी डॉ. विष्णू रोटे, रमेश शिंदे, मधुकर बाविस्कर, मुलचंद नाईक, बिकाजी अहिरे, सखाराम मोरे, नितीन सूर्यवंशी, विवेक नरवाडे, वाडीलाल चव्हाण, मनोज देशमुख व कार्यकारिणी सदस्य व कायम निमंत्रित असे एकूण १८० पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.