जिल्हा बँक निवडणूक : अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला पण २ जागेंसाठी अडले घोडे

सप्टेंबर 28, 2021 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक अविरोध व्हावी म्हणून सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, 21 पैकी एक-दोन जागांबाबत एकमत होत नसल्याने सर्वपक्षीय पॅनलचे घोडे अडले आहे. भाजपने आठ जागांवर आपला दावा केला असून रावेर व चाळीसगाव साठी काँग्रेस ठाम असल्याने हा तीढा वाढला आहे. आता जागा वाटपाच्या अंतिम निर्णयासाठी पुन्हा बैठक होणार असून, त्यात सर्वपक्षीय पॅनलचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा आहे.

khadse girish gulabrao patil

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी रात्री आठ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर सुमारे तासभर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये बंदद्वार खल चालला. पण अखेर एक-दोन जागांबाबत निर्णय होऊच शकला नाही.

यांची होती उपस्थिती :

या बैठकीला शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, भाजपकडून माजी मंत्री गिरीज महाजन, आमदार सुरेश भोळे तसेच काँग्रेसच्या वतीने आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील आदींची उपस्थिती होती. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन हे पुन्हा एकत्र आले होते.

सव्वा-सव्वा वर्षे अध्यक्षपदाचा फॉर्म्युला?

या बैठकीत बँकेच्या अध्यक्ष पदाचा फॉर्म्युला मात्र, सर्वानुमते ठरला. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस अशा चारही पक्षांनी 5 वर्षांपैकी प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्षे अध्यक्ष पद भूषवावे, असा निर्णय नेत्यांमध्ये झाला आहे. मात्र, सुरुवातीला नेमक्या कोणत्या पक्षाचा अध्यक्ष असेल, हे अद्याप ठरलेले नाही. निवडणुकीनंतर ऐनवेळी त्याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे.

या जागांचा तीढा कायम

कोअर कमिटीच्या बैठकीत चाळीसगाव, रावेर, यावल, एनटी राखीव व महिला राखीव या जागांबाबत एकमत होऊ शकले नसल्याचे समजते. पुन्हा जागांबाबत चर्चा होणार असून निवडणूक जाहीर होण्याच्या आगोदर सर्वपक्षीय उमेदवार निश्चित होणार आसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा बँकेच्या हितासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आसल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. बिनविरोध निवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now