जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

ऑक्टोबर 24, 2021 8:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील केबल नादुरुस्त झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.

Water Supply jpg webp

जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाघूर पम्पिंग स्टेशनला होणारा वीज पुरवठा सोमवार दि.२५ रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहराला होणारा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार दि.२५ रोजी होणारा पाणी पुरवठा मंगळवार दि.२६ रोजी व मंगळवार दि.२६ होणारा पाणी पुरवठा बुधवार दि.२७ रोजी होणार आहे तर बुधवार दि.२७ रोजी होणारा पाणी पुरवठा गुरुवार दि.२८ रोजी करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now