जळगाव शहराचा पाणी पुरवठा पुन्हा पुढे ढकलला

सप्टेंबर 1, 2021 9:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर जलवाहिनीवरील केबल दुरुस्तीच्या कामामुळे वाघूर पंपींग स्टेशनला होणारा विज पुरवठा सकाळपासून बंद राहणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

water problem

शहराला पाणी पुरवठा करण्याकामी पाणी पुरवठा योजनेंतर्गत मानराज मोटर्स समोरील १५०० मिमी व्यासाच्या पाईपलाईनच्या गळतीचे काम आज दि.१ रोजी हाती घेण्यात आले आहे. कामामुळे वाघूर पंपींग स्टेशनला होणारा विज पुरवठा उद्या दि.२ रोजी सकाळी ९ वाजेपासून बंद राहणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

यानुसार दि.२ रोजीचा पाणी पुरवठा ३ रोजी करण्यात येईल तसेच ३ व ४ रोजीचा पाणीपुरवठा अनुक्रमे ४ व ५ रोजी करण्यात येईल असे शहर अभियंता यांनी कळविले आहे. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now