---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

Breaking : महावितरणचा कंत्राटी वायरमन १ लाखाची लाच घेताना जाळ्यात, जळगावातील प्रकार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : 10 जानेवारी 2024 : लाचखोरीची एक मोठी बातमी जळगावातून समोर आली आहे. महावितरणच्या कंत्राटी वायरमनला तब्बल १ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) असे लाचखोर वायरमनचे नाव असून याबाबत जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

lach jpg webp webp

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदाराने घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांवच्या पथकाने भेट दिली होती. या भेटीनंतर त्यांना आता ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती.

---Advertisement---

त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष १ लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---