जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही नोकरीची शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मध्ये मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती होणार असून या भरतीद्वारे २७५६ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे.

१२वी पास आणि आयटीआय, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. इंडियन ऑइलमधील ९ रिफाइनरी युनिटमध्ये ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. तुमची निवड थेट मेरिट बेसिसवर होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०२५ आहे.तुम्हाला iocl.com वर जाऊन अर्ज करायचा आहे.

भरतीसाठी पात्रता काय?
अप्रेंटिस पदासाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी (मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंडस्ट्रीयल केमिस्ट्री) मध्ये ३ वर्षांचा बी.एससी केलेली असावी. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावे. ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी १२वी पास असणे गरजेचे आहे.१८ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचे आहेत
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला iocl.com वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर करिअर सेक्शनवरी अप्रेंटिसशिपवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला Click Here to Register/Apply on NATS/NAPS Portal NATS, NAPS वर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचे आहे तिथे फॉर्म भरायचा आहे.
तुमची सर्व माहिती भरा. शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा. यानंतर फोटो आणि सही अपलोड करावीत.
यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.












