⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | बातम्या | दररोज फक्त 10 रुपये वाचवून तुम्ही बनू शकता लखपती, तुम्हाला फक्त ‘हे’ काम करायचे आहे

दररोज फक्त 10 रुपये वाचवून तुम्ही बनू शकता लखपती, तुम्हाला फक्त ‘हे’ काम करायचे आहे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२४ । भविष्य सुरक्षित करण्याचा विचार जेव्हा होतो तेव्हा बहुतेक लोक असे म्हणताना दिसतात ‘अरे, एवढा पैसा कुठे गुंतवायला उरला आहे?’ मात्र, थोडे थोडे करून तुम्ही लाखो रुपयाचा निधी जमा करू शकतात. त्या पैशातून तुम्ही कार खरेदी करू शकता किंवा इतर गरजा पूर्ण करू शकता. होय आज आम्ही तुम्हाला लखपती बनण्याची कल्पना सांगणार आहोत. तुमचे हे स्वप्न सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून पूर्ण होऊ शकते. एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढीचा लाभ मिळतो आणि दीर्घकाळात जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

300 रुपयांची SIP सुरू करा
जर तुम्ही दररोज 10 रुपये वाचवले आणि SIP मध्ये दरमहा 300 रुपये गुंतवण्याचा पर्याय निवडला आणि दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवली, तर तुम्ही पुढील 30 वर्षांत 45 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता. येथे आम्ही सुमारे 15 टक्के वार्षिक परताव्यासह 45 लाख रुपयांचा निधी जमा करू. हे लक्षात घेण्यासारखे आहे की तुमची गुंतवणूक फक्त 5 लाख 92 हजार रुपये असेल. असे नाही की म्युच्युअल फंड एसआयपीवर 15 टक्के परतावा हा केवळ सांगण्यासारखा आहे. बाजारात अशा अनेक फंड योजना आहेत ज्यांनी दीर्घ मुदतीत बंपर परतावा दिला आहे.

SIP म्हणजे काय?
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे SIP. याद्वारे तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. एसआयपी हे अगदी बँकेच्या आरडीसारखे आहे, परंतु येथे तुम्हाला बँकेपेक्षा चांगले परतावे मिळतात. दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ठराविक वेळेत एक निश्चित रक्कम कापली जाते आणि SIP मध्ये गुंतवली जाते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.