इंडियन बँकेत 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 28000 वेतन मिळेल

मार्च 6, 2022 3:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । इंडियन बँकमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक संधी आहे. इंडियन बँकेने (Indian Bank Recruitment 2022) सुरक्षा रक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी प्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे आणि अधिसूचना पूर्णपणे वाचली पाहिजे.

Indian Bank Recruitment 2022 jpg webp

या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट, indianbank.net.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मार्च ९ आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 202 पदे भरण्यात येणार आहेत.

कूण जागा : २०२

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांनी मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळातून 10 वी (S.S.C./Matriculation) उत्तीर्ण केलेली असावी किंवा समकक्ष तसेच लष्कर/नौदल/हवाई दलातील माजी सैनिक. तसेच, उमेदवाराला स्थानिक भाषेत बोलता, वाचता आणि लिहिता येत असावे.

इतका मिळेल पगार :

14500 – 500/4 – 16500 – 615/5 – 19575 – 740/4 -22535 – 870/3 – 25145 -1000/3 – 28145

निवड प्रक्रिया :

निवड या आधारावर केली जाईल:

वस्तुनिष्ठ प्रकार चाचणी – ऑनलाइन
स्थानिक भाषा चाचणी
शारीरिक फिटनेस चाचणी
हलक्या मोटार वाहनाचा वैध व्यावसायिक ड्रायव्हिंग परवाना असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now