⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, एका चार्जमध्ये धावेल 200 KM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. दुचाकीनंतर आता बाजारात चारचाकी वाहने देखील येऊ लागले आहे. अशातच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. मुंबईस्थित स्टार्टअप पीएमव्ही इलेक्ट्रिकने ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ही एक मायक्रो-इलेक्ट्रिक कार आहे, ज्याचे नाव EaS-E (EAS-E) आहे. कंपनीने त्याची किंमत 4.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. ही किंमत सुरुवातीच्या 10 हजार ग्राहकांसाठी असेल. लॉन्च होण्यापूर्वीच या वाहनाला 6000 बुकिंग मिळाले आहेत. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून हे वाहन बुक करू शकतात.

आकाराने सर्वात लहान
सर्वात स्वस्त असण्यासोबतच ही देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे. PMV Eas-E इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज केल्यावर 200 किमी पर्यंतची रेंज देते. त्याचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. PMV Eas-E इलेक्ट्रिक स्मार्ट कार मोबाईल फोनद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते.

कारला IP67 रेटिंगसह 10 Kwh लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी पॅक मिळतो. इलेक्ट्रिक कार PMSM इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाईल जी 10kw पॉवर आणि 500 ​​Nm टॉर्क निर्माण करते.

PMV चा दावा आहे की Eas-E इलेक्ट्रिक कारची ऑपरेटिंग किंमत 75 पैसे/किमी पेक्षा कमी आहे. या इलेक्ट्रिक कारला क्रूझ कंट्रोल, रिमोट पार्किंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑन-बोर्ड नेव्हिगेशनसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. स्मार्ट कारच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड करण्यात आली नसल्याचा कंपनीचा दावा आहे. कारला उच्च ताकदीच्या शीट मेटलसह एअरबॅग आणि सीटबेल्ट मिळतात.