जळगाव:- गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गाणी आणि भाषणांद्वारे आपल्या देशभक्तीची भावना व्यक्त केली. नृत्य, नाटिका आणि संगीत कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन केले, ज्यामुळे सर्वांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागवला गेला.
संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्रतेचे महत्त्व विषद केले.यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, आणि नाटिका सादर करून स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांचे स्मरण केले. गोदावरी फौंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना देशासाठी कर्तव्यनिष्ठ राहण्याचे आवाहन केले.सचिव डॉ. वर्षा पाटील, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्कूलच्या प्राचार्या निलिमा चौधरी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.