⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जिल्ह्यात विदेशी, बिअर, वाईन दारू विक्रीत वाढ ; वाचा आकडेवारी..

जिल्ह्यात विदेशी, बिअर, वाईन दारू विक्रीत वाढ ; वाचा आकडेवारी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्यात विदेशी दारू विक्रीत 14 टक्के, बिअर 13 टक्के व वाईन 16 टक्के वाढ झाली असून देशी दारू विक्रीत 2 टक्के घट झाली आहे. या दारू विक्रीतून महसूलात 34 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या मागील वर्षाच्या सहामाही दारू विक्री व महसूलाच्या तुलनेत एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्याच्या विदेशी, बिअर व कालावधीत दारू विक्रीत वाढ झाली आहे. तर देशी दारू विक्रीत 2 टक्के घट झाली आहे. महसूलात 34 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दारू विक्रीतून शासनाला या सहामाहीत 5 कोटी 47 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर 2022 च्या तुलनेत यावर्षीच्या सहामाहीत महसूलात 1 कोटी 38 लाखांची वाढ झाली आहे.

यामध्ये एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाहीत 49 लाख 74 हजार 23 लीटर देशी दारू विक्री झाली आहे. 2022 यावर्षी याच कालावधीत 50 लाख 50 हजार 246 लिटर देशी दारू विक्री झाली होती. एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाहीत 31 लाख 83 हजार 542 लीटर विदेशी दारू विक्री झाली आहे. 2022 यावर्षी याच कालावधीत 27 लाख 91 हजार 183 लिटर विदेशी दारू विक्री झाली होती. एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाहीत 36 लाख 62 हजार 325 लीटर बिअर दारू विक्री झाली आहे. 2022 यावर्षी याच कालावधीत 32 लाख 37 हजार 889 लिटर बिअर दारू विक्री झाली होती.

एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाहीत 56 हजार 359 लीटर वाईन दारू विक्री झाली आहे. 2022 यावर्षी याच कालावधीत 45 हजार 936 वाईन दारू विक्री झाली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.