⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | वाणिज्य | खरिपातील 14 पिकांच्या हमीभावात वाढ; आता धानासह कापसाला मिळणार इतका भाव?

खरिपातील 14 पिकांच्या हमीभावात वाढ; आता धानासह कापसाला मिळणार इतका भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२४ । शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यात शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) मंजूर केली आहे.२०२४-२५ साठी १४ खरीप पीकांची एमएमसी वाढवण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

या निर्णयानंतर धानाला २३०० रूपये क्विंटल भाव दिला जाणार आहे. धानाच्या किंमतीत १७० रूपयाची वाढ करण्यात आली आहे. कापसाच्या एमएसपीत ५०० रूपयाची वाढ करण्यात आली आहे. आता कापसाचा नवीन दर ७ हजार ५२१ रूपये आणि ७ हजार १२१ रूपये प्रतिक्विंटल असणार आहे.

१४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत किती?
ज्वारी ३ हजार ३७१ रूपये, मूग ८ हजार ६८२, मका २ हजार २२५ रूपये, तूर ७ हजार ५५० रूपये, मूग ८ हजार ६८२ रूपये, नाचणी ४ हजार ९० रूपये, उडीद ७ हजार ४०० रूपये, बाजरी २ हजार ६२५ रूपये, सुर्यफूल ७ हजार २८० रूपये, भूईमूग ६ हजार ७८३ रूपये, सोयाबीन ४ हजार ८९२ रूपये प्रतिक्विंटल असा भाव जाहीर करण्यात आला आहे. देशात शेतमालासाठी २ लाख टनाचं स्टोरेज तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.