10वी उत्तीर्ण उमेदवारांना आयकर विभागात नोकरीचा गोल्डन चान्स

एप्रिल 12, 2022 2:40 PM

आयकर विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

income

इनकम टॅक्स विभागाच्या स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफसह विविध पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले प्रतिभावान खेळाडू या पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती क्रीडा कोट्यातून होणार आहे.

सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफसह विविध रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अधिकृत वेबसाइट www.incometaxindia.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे. हा फॉर्म नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now