जळगावकरांना एकाच छताखाली मिळणार सर्व राज्यांतील साड्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । जळगाव शहरात भंगाळे गोल्ड या सोन्या चांदीच्या नावीन्यपूर्ण दागिन्यांसह विश्वास, सचोटी व सोन्याचा योग्य भाव या त्रिसूत्रीने ग्राहकांचे मन जिंकणाऱ्या भंगाळे परिवाराने भंगाळे सिल्कच्या माध्यमातून साडी, ड्रेसमटेरियल यांचे तीन मजली सुसज्ज एसी दालन जळगावकरांना उपलब्ध करून दिले आहे. आज (दि.६) भंगाळे सिल्कचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जळगावकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत या शुभारंभ सोहळ्याला गर्दी केली होती.

सकाळी रामदास भंगाळे व डॉ.अर्जुन भंगाळे यांच्या हस्ते फीत कापून भंगाळे सिल्क या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला शहराचे आमदार राजूमामा भोळे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, डॉ.केतकी पाटील, मेजर नाना वाणी, नितीन लढ्ढा, व्यावसायिक अनिल कांकरिया यांच्यासह राजकीय, सामाजिक व व्यवसाय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भंगाळे परिवाराला शुभेच्छा दिल्यात.

भंगाळे सिल्क या दालनात पैठणी, कांजीवरम, हॅण्डलूम सिल्क, पेशवाई सिल्क, डिझायनर साडी, घागरा, पंजाबी ड्रेस यासह भारतातील प्रत्येक प्रांताचे वैशिष्ट असणाऱ्या साड्या जळगावकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजच्या शुभारंभ सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल भंगाळे परिवारातर्फे भागवत भंगाळे यांनी जळगावकरांचे आभार मानले आहे.










