⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा थाटात

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे अमळनेर दौऱ्यावर असताना आमदार अनिल भाईदास पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. अनेक दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले होते. आमदार अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून राष्ट्रवादीच्या या भव्य कार्यालयाचे निर्माण धुळे रोडवरील सिद्धीविनायक कॉलनीत झाले आहे.


सदर उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आजी माजी मंत्री तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र भैय्या पाटील, माजी.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, पाचोऱ्याचे माजी आ.दिलीप वाघ, चोपडा येथील मा.आ. कैलास पाटील, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस हाजी एजाज माजी शिक्षक आ.दिलीप सोनवणे,ज.जि.कॉटन फेडरेशन चेअरमन संजय पवार, रा.कॉ. महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, योगेश देसले, रविंद्र पाटील,ग्रथालय सेल प्रदेशाध्यक्ष उन्मेष पाटील, तिलोत्तमा पाटील,शिवाजीराव पाटील,रा विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी परिस्थिती असताना अमळनेरच्या जनतेने धनास बळी न पडता राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिल्याबद्दल उपस्थित जनसमुदाय यांच्यासमोर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे नतमस्तक होत अभिवादन करत आभार मानले.आतापर्यंत प्रत्येक तालुक्यात आमदार कार्यालय पाहिले आहे. परंतु, आ.अनिल पाटील यांनी कार्यालय न करता,कुणीतरी पहिल्यांदा असे पक्षाचे कार्यालय उभारून तळा गाळातील सर्वसामान्य माणसास या माध्यमातून न्याय मिळवून देण्याच एक फार मोठं काम या ठिकाणी केले आहे

आ.अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात कुणीतरी एकदा आपल्या तालुक्यात आमदार झाले, पडले तरी तरीदेखील त्यांचे आमदार कार्यालय कायम असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात आपण आमदार असलो, नसलो मात्र पक्षाचे कार्यालय कायम राहील असेही आ.अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले. मनात धडपणारा प्रश्नओठावर आला अन, थेट मंत्री महोदय यांच्यासमोर पक्षाचे व जनतेच असच प्रेम कायम राहिल्यास तसेच ना.मुंडे व वरिष्ठांनी ठरवले तर पुढे खासदार व मंत्री होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.असंही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पक्षाचे स्थानिक सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.