मध्यरात्री चोरट्यांनी साधला डाव, दोन मोबाईल लंपास

ऑगस्ट 4, 2022 2:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । शहरातील रेमंड कॉलनीत घरातील सगळे जेवण करून झोल्याचे हेरत चोरट्यांनी मध्यरात्री डाव साधून दोन मोबाईल लंपास केले. ही घटना २ रोजी रात्री वाजता घडली. याबाबत बुधवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 10T120103.175 jpg webp

विजयकुमार विरेंद्रसिंग (वय ३८) रा. रेमंड कॉलनी, एमआयडीसी, जळगाव यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. २ ऑगस्ट रेाजी रात्री १२ वाजता ते कुटुंबीयांसह जेवण करून झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात असलेले ११ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेण्याचे बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले.

याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now