पारोळा तालुक्यात चोरट्यांनी लंपास केली गाय

एप्रिल 9, 2022 4:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । चोरटा काय चोरून घेऊन जाईल याचा नेम नाही. पारोळा तालुक्यातील बोळे येथे चक्क गाय लंपास केल्याची घटना उघडीच आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

crime 6 jpg webp

अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील बोळे येथे दि.६ च्या मध्यरात्री १० ते २ दरम्यान जरशी गाय चोरी गेली. याबाबत कैलास रमेश नावरकर यांनी आपल्या घरासमोर दि.6 रोजी रात्री ९ वाजता लाल रंगाची जरशी गाय (किंमत ३० हजार रुपये) दोरीने बांधली होती. मध्यरात्री २ वाजता ते लघुशंकेसाठी उठले असता गायीचा दोर कापून तिला चोरटे घेऊन गेल्याचे समजले. शोधाशोध करूनही गाय सापडली नाही. याबाबत विजय भोई तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now