जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव | तुषार देशमुख | आज दिनांक 30 रोजी दुपारी 4 वाजता चाळीसगावात येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बससेवा सुरू करण्यास तीव्र विरोध करण्यात आला.आज चाळीसगाव मधील एसटी डेपो मध्ये चार कर्मचारी हजर राहून दोन बस सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र याची बातमी मनसेला कळताच मनसेचे पदाधिकारी ताबडतोब बसस्थानक कडे रवाना झाले. आणि त्यांनी रस्त्यामध्ये बस अडवून या सुरू होणाऱ्या बस सेवेला आक्रमक पवित्रा घेत तीव्र विरोध केला.आणि बसमधील चालक वाहक यांना संपामध्ये पुन्हा सामील होण्याचे जाहीर आवाहन केले. चालक,वाहक यांना मनसेतर्फे सर्वतोपरी समज देऊन त्यांना श्रीफळ देऊन पुन्हा संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये सामील व्हावे अशी विनंती करण्यात आली.

याप्रसंगी मनसेचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे, शहराध्यक्ष अण्णा विसपुते, मनसे पदाधिकारी पंकज स्वार, दीपक पवार, वाल्मीक पाटील, पिंटू देसले, बबलू महाजन, भैय्या चौधरी, तुषार देशमुख आणि इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :
- अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जळगाव जिल्ह्यातील ५३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध!
- मान्सून पुन्हा होणार पूर्ण क्षमतेने सक्रिय! जळगाव जिल्ह्यात पुढील ४-५ दिवस धोक्याचे?
- डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय परिसरात चिमुकले विठ्ठल नामात झाले दंग
- डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
- आनंदाची बातमी! गिरणेचा जलसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला; जुलैअखेर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता











