शेतात जाऊन तरुणाने घेतला झाडाला गळफास ; कारण अस्पष्ट

ऑक्टोबर 30, 2023 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२३ । अलीकडच्या काळात किशोरवयीन आणि तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे चिंतेचा विषय बनला आहे. यातच एका तरुणाने शेतातील झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथे घडली. जयेश शरद पाटील (वय-२३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्यामागील कारण अस्पष्ट आहे.

succied fashi jpg webp

अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथे जयेश पाटील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. ‍शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

मुरलीधर आनंदा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील अगोने करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now