⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहरवासियांसाठी सोमवारच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी..

जळगाव शहरवासियांसाठी सोमवारच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 11 फेब्रुवारी 2024 । जळगाव शहरवासियांसाठी सोमवारच्या पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या वाघूर धरणावरील पंपिंग व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा उद्या म्हणजेच १२ रोजी दिवसभर बंद राहणार आहे. या दरम्यान राँ-वॉटर जलवाहिनीवर नॉन रिटर्न व्हॉल्या बसवण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार असून, रोटेशन एक दिवस पुढे ढकलले आहे.

एमआयडीसी अंतर्गत १३२ केव्हीए सबस्टेशन अंतर्गत देखभाल व दुरुस्तीसाठी १२ फेब्रुवारी रोजी वाघूर पंपिंग उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. वाघूर पंपिंग येथे धरणातून आलेल्या रों-वॉटर जलवाहिनीवर स्लुइस व्हॉल्व्ह व नॉन रिटर्न व्हॉल्व्ह बसवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला आहे.

रोटेशन एक दिवस पुढे
शहरात १२ फेब्रुवारी रोजी होणारा पुरवठा आता १३ रोजी होईल. अशाच्प्रकारे एक दिवस रोटेशन पुढे ढकलले जाणार आहे. दरम्यान,नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.